Dhule Shiv Sena, Dhule Latest Marathi News, Shivsena Political Crisis Saam tv
महाराष्ट्र

Dhule : बंडखोर आमदारांच्‍या निषेधार्थ धुळ्यात मोर्चा

बंडखोर आमदारांच्‍या निषेधार्थ धुळ्यात मोर्चा

भूषण अहिरे

धुळे : मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर धुळ्यात उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहेत. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांतर्फे बंडखोर आमदार व मंत्र्यांच्या निषेधार्थ मोर्चा काढून निषेध करण्यात आला. (dhule news shiv sena morcha to protest against rebel MLAs)

मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर धुळ्यात (Dhule) उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. यामुळे दे धक्का कर भनका असे म्हणत मंत्री एकनाथ शिंदे यांनी गोवाहाटी येथे कैद करून ठेवलेले 50 कोटींचे कुत्रे या आशयाचे फलक देखील झळकवत (Shiv Sena) शिवसैनिकांनी मोर्चा काढला. यात धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार त्याचबरोबर, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे यांच्यासह आणखी इतर मंत्र्यांच्या प्रतिमेला कुत्र्याची उपमा देत या आशयाचे फलक झळकावले आहेत.(Dhule Latest Marathi News)

फोटोला मारले जोडे

त्याचबरोबर या सर्व बंडखोर मंत्र्यांच्या व आमदारांच्या फोटोला जोडे मारून व घोषणाबाजी करत मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वर आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा देखील सहभाग असल्याचे बघायला मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Aravallis Hills: अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाणकामावर पूर्णपणे बंदी, राज्यांना आदेश

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे

Maharashtra Live News Update: चित्रपट दिग्दर्शक सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

'वंचित' आणि MIM ने निवडणुकीसाठी रणशिंग फुकलं; उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT