shirpur malnutrition 
महाराष्ट्र

अनोखे मॉडेल..कुपोषण हटविणार गंगा माँ मंडल परसबाग

अनोखे मॉडेल..कुपोषण हटविणार गंगा माँ मंडल परसबाग

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : आदिवासी महिलांमधील कुपोषण निर्मूलनात सहाय्यक ठरू शकणाऱ्या गंगा माँ परसबागेचे मॉडेल आंबे (ता. शिरपूर) येथे द्वेतानगरमध्ये तयार करण्यात आले आहे. घरीच पौष्टिक, सकस सेंद्रिय भाजीपाला पिकवून त्याचा उपयोग दैनंदिन आहारात करण्याची मध्यवर्ती संकल्पना असलेला हा उपक्रम लवकरच व्यापक स्वरूपात तालुकाभरात राबविला जाणार आहे.

प्रियदर्शिनी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांची कन्या द्वेता पटेल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू असून, महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत धुळे येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे. मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टने या उपक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले असून, अशा पद्धतीचा तालुक्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे.

असा आहे प्रकल्प

परसबाग संकल्पना ग्रामीण भागासाठी नवी नाही. मात्र, शास्त्रशुद्ध पद्धतीने भाजीपाला उत्पादन आणि सेवन यांची सांगड घालून कुपोषणाला अटकाव करण्यात मदत व्हावी, या हेतूने यापूर्वी प्रयत्न झाले नव्हते. सात दिवसांत भाज्या, असे या उपक्रमाचे सूत्र आहे. गंगा माँ मंडल परसबागेचा आराखडा वर्तुळाकार आहे. त्यात सहा केंद्रीभूत वर्तुळे आहेत. पालेभाज्या, कंदमुळे, वेलवर्गीय भाज्या, फळभाज्या आणि सोयाबीन आदींसाठी १४ अधिक १ बेड तयार केले जातात. तेथे हंगामानुरूप योग्य बियाणे निवडून शास्त्रीय पद्धतीने लागवड केली जाते. आवश्यकतेनुसार पाणी दिले जाते. रासायनिक खते, कीटकनाशके यांचा किमान वापर करून भाजीपाला पिकविण्यासाठी प्रयत्न केले जातात. गुरांचा शिरकाव, अतिक्रमण टाळण्यासाठी बांबू व हिरवी जाळी वापरून कुंपण केले जाते. या मॉडेलमधून प्रत्येक हंगामात १४ प्रकारच्या भाज्या पिकवणे शक्य असून, वर्तुळाच्या मध्यभागी फळभाजी किंवा कढीपत्ता घेता येऊ शकतो.

..अशी साकारली संकल्पना

द्वेता पटेल यांनी तालुक्याच्या आदिवासी भागात युवती व महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरांचा उपक्रम राबविला. त्यात अनेक आजारांचे मूळ कुपोषणात असल्याचे दिसून आले. अन्नात पौष्टिक, प्रथिनयुक्त सकस घटकांचा अभाव असल्याने कुपोषण होत असल्याचे निदान झाल्यानंतर द्वेता पटेल यांनी तज्ज्ञ डॉक्टर्सशी चर्चा केली. कुटुंबाला परवडेल असा पौष्टिक भाजीपाला परसबागेतच पिकवला तर कुपोषण निर्मूलनासाठी बऱ्याच अंशी मदत होऊ शकेल, असा निष्कर्ष काढल्यानंतर त्यांनी धुळे येथील कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला. तेथील शास्त्रज्ञ डॉ. अमृता राऊत, रोहित कडू यांनी परसबागेचा आराखडा तयार केला. त्याचे मॉडेल साकारण्यासाठी आंबे येथील द्वेतानगर या आदिवासी वस्तीची निवड करण्यात आली. आमदार काशीराम पावरा, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, आंबे सोसायटीचे अध्यक्ष रमेश माळी यांनी वेळोवेळी भेट देऊन ग्रामस्थांची मानसिक तयारी करून घेतली. तेथील ३५ कुटुंबांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. आगामी काळात तालुकाभरात गंगा माँ मंडल परसबागा साकारण्याचे नियोजन सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुमंत्रालयातील कॅन्टीनला क्लीनशीट कशी? संजय गायकवाडांचा संताप

3 Gram Mangalsutra Designs: ऑफिस ते रोजसाठी परफेक्ट! ३ ग्रॅमचे लाईटवेट मंगळसूत्र पाहा ट्रेंडी ७ सुंदर डिझाइन्स

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT