Accident 
महाराष्ट्र

भोलेनाथाचे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

भोलेनाथाचे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

भूषण अहिरे

धुळे : श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी उज्जैनहुन दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. दोंडाईचा– शिंदखेडा रस्‍त्‍यावर झालेल्‍या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. (dhule-news-shindkheda-dondaicha-road-accident-one-death-and-sevan-injured)

श्रावण महिना आजपासून सुरू झाला असल्यामुळे पहिलाच सोमवारी उज्जैनहुन दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला झाला असल्याचे दिसून येत आहे. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा व शिंदखेडा या रस्त्यावर आज सकाळी भाविकांच्या वाहनाला प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोलेरोने धडक दिली. या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु यामध्ये आणखी काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची परिस्थिती बघता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नागरीक आले धावून

घटनेची माहिती परिसरात पसरताच परिसरातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले. पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी उज्जैन येथून दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT