Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार ३० जुलैला धुळे दौऱ्यावर

राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार ३० जुलैला धुळे दौऱ्यावर

साम टिव्ही ब्युरो

धुळे : येथील काही कार्यकर्ते आणि दानशूरांच्या आर्थिक योगदानातून राष्ट्रवादी भवनाचे नूतनीकरण झाले आहे. यासंदर्भात होणाऱ्या कार्यक्रमास पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे ३० जुलैला येथे दौऱ्यावर असतील, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष (Anil Gote) अनिल गोटे यांनी पत्रकाव्दारे दिली. (Dhule News Sharad Pawar)

राष्ट्रवादी (NCP) भवनाच्या नूतनीकरणाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी श्री. गोटे यांच्याशी मुंबईत चर्चा केली. तसेच या कामाबाबत समाधान व्यक्त केले. यासंदर्भात कार्यक्रमाच्या तयारीसाठी श्री. गोटे यांनी मंगळवारी (Sakri) साक्री, बुधवारी शिंदखेडा, गुरूवारी शिरपूर, शुक्रवारी (Dhule) धुळे शहर व तालुका दौरा आणि शनिवारी मुख्य कार्यक्रमास उपस्थिती, असे नियोजन केले आहे. यानुसार पक्ष कार्यकर्त्यांनी त्या- त्या विश्रामगृहात दुपारी एकला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

असा आहे कार्यक्रम

खासदार पवार हे २९ जुलैला सायंकाळी सातला नाशिकला दाखल होतील. तेथून ते ३० ला सकाळी साडेआठला धुळ्याकडे निघतील. त्यांचे सकाळी साडेअकराला आगम होईल. मिरवणुकीने ते दुपारी बाराला गुलमोहर विश्रामगृहात उपस्थित होतील. दुपारी साडेबारापर्यंत ते शिष्टमंडळे व कार्यकर्त्यांशी हितगुज साधतील. नंतर दुपारी पाऊण ते अडीचपर्यंत राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल. पत्रकारांशी संवादानंतर ते दुपारी साडेतीनपर्यंत मल्हार बागेत असतील. तेथून नाशिकला रवाना होतील, अशा नियोजीत दौऱ्याची माहिती श्री. गोटे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची 3 ठिकाणी घेतली झाडाझडती

तुम्हाला लागलीय का RBI ची लॉटरी? RBIची 'लॉटरी' लागल्याचा ईमेल आलाय?

Veg Kurkure Momos Recipe: घरी बनवा खुसखुशीत आणि चविष्ट व्हेज कुरकुरे मोमोज; वाचा सोपी रेसिपी

Ahilyanagar: तलावात पोहताना भयंकर घडलं, पाण्यात बुडून MBA च्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू; अहिल्यानगरमध्ये खळबळ

शाळेचा खर्च अजून वाढला, स्कूल बसच्या भाड्यात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ

SCROLL FOR NEXT