Sakri Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Sakri Water Crisis : उन्हाच्या तीव्र झळांमध्ये पाण्यासाठी वणवण; साक्री तालुक्यातील भीषण चित्र

Dhule News : यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तिव्रता देखील अधिक प्रमाणात वाढली आहे. काही ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पाणी टंचाईचे भीषण चित्र

भूषण अहिरे

धुळे : उन्हाच्या तीव्र झळा जाणविण्यास सुरवात झाली आहे. यानंतर ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांवर भटकण्याची वेळ आली आहे. धुळे शहर व ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या दरवर्षी जाणवत असते. यंदा देखील तीच परिस्थिती निर्माण झाली असून साक्री तालुक्यातील धंगाई गावात महिलांना पाण्यासाठी उन्हातानात लांबपर्यंत पायपीट करावी लागत आहे. महिलांना पाण्यासाठी गावाबाहेर असलेल्या विहरीवर पायपीट करावी लागत आहे. 

यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तिव्रता देखील अधिक प्रमाणात वाढली आहे. त्यानुसार काही ठिकाणी पाण्याची समस्या देखील निर्माण झाली आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पाणी टंचाईचे भीषण चित्र पाहण्यास मिळत आहे. दापूर गृप ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या धंगाई गावाबाहेर दोन ते तीन किलोमीटर विहीरीत बादलीने पाणी काढून आणावे लागत आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी ग्रामसेवक धंगाई गावापर्यंत येत नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. 

निम्मे गावातच पोहचते पाणी 

साक्री तालुक्यातील धंगाई हे गाव दापूर या ग्रुप ग्रामपंचायतीत असणारे गांव आहे. येथे कोकणी, भिल्ल समाज वस्ती असून सर्व मजूरीवर अवलंबून आहेत. मजुरीसाठी सकाळी त्यांना घराबाहेर पडावे लागते. म्हणून पाण्यासाठी पहाटे उठून जावे लागत असते. येथे नव्याने पाणी पुरवठा योजना मंजूर असून पाण्याची टाकी आहे. पण या टाकीत अद्याप पाणी पोहचलेच नाही. तिची टेस्टीगही घेण्यात आली नाही. येथे जुनी टाकी आहे, पण पाण्याचा नियोजन अभावी एकाच गल्लीत पाणी जाते; तर निम्मी गावकऱ्यांना पाणी पोहचतच नाही. 

पाण्यासाठी महिलांची उडते झुंबळ 

पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरींना पाणी आहे. पण नियोजन अभावी गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. तर गावाबाहेरील विहीरीतील पाण्याने तळ गाठला असल्याने महिलांना पाणी मिळावे म्हणून झुंबड होत असते. पाण्यासाठी अनेकदा भांडण देखील होत असते. अशा घटना सकाळ संध्याकाळ पाहायला मिळतात. आता मार्च महिना सुरू होवुन पंधरा दिवस झाले असून एप्रिल, में व जूनपर्यंत पाणी कसे मिळेल? यासाठी येथील नागरीकांनी साक्री पंचायत समितीवर हंडा मोर्चा नेण्याचा इशारा येथील महिला, पुरुषांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PMC News: विकासकामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला? पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेटकार्ड उघड

Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे! हृदयापासून मेंदूपर्यंत होतील मोठे बदल

Gold Price: देशात सोनं टंचाई? आयात रखडली, किंमती वाढणार? व्यवहारांनाही मोठा ब्रेक

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत स्ट्रीट लाईट बंद

Pune University: बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई; रमेश मुखेकर निलंबित

SCROLL FOR NEXT