Accident 
महाराष्ट्र

बिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात; ट्रक चालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघात

बिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात; ट्रक चालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघात

Rajesh Sonwane

धुळे : शिरपूर तालुका हद्दीवरील महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर बिजासन घाटात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढे चालणाऱ्या ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात झाला. सदर अपघातात वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी टळली आहे. (Second accident of the week in Bijasan Ghat; Accident due to loss of control of truck driver)

बिजासन घाटातच गेल्या काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर सदर ठिकाणापासून काही अंतरावर अपघात झाला होता. या अपघातात कळवण तालुक्यातील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर पुन्‍हा अपघात झाला.

ब्रेक फेल झाल्‍याने नियंत्रण सुटले

महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या मुंबई– आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात सेंधवा येथून धान्याचे पीठ घेऊन मुंबई येथे जात असलेल्या ट्रक (क्र. MH18, BA 9991) हा बिजासन पोलीस चौकीच्या काही अंतरावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. यात पुढे चालणाऱ्या ट्रकच्या मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. अपघात झाल्यानंतर नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी मदत कार्य करून जखमींना महामार्ग अम्ब्युलन्सच्या साहाय्याने सेंधवा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT