Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: व्यापाऱ्याची लुटमार; टोळीतील एक पोलिसांच्‍या ताब्‍यात

व्यापाऱ्याची लुटमार; टोळीतील एक पोलिसांच्‍या ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : व्यापाऱ्याच्‍या डोळ्यात मिरची पावडर टाकून पैसे लुटले होते. पैशांची लुट करून पोबारा करणाऱ्या टोळीतील एकाला (Dhule News) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्‍यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

धुळे (Dhule) शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गेल्या काही दिवसांपूर्वी व्यापाराचे काही अज्ञातांनी गाडीसह 23 लाखांहून अधिकची रक्कम डोळ्यात मिरचीची पूड टाकून पळून नेल्याची घटना घडली होती. या संदर्भात आझादनगर (Police) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जालना (Jalna) येथून एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अन्‍य साथीदारांचा शोध सुरू

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या या जबरी चोरी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कामगिरी केली असून चोरीतील आणखी साथीदारांचा देखील शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘शिवसेना कोणाची?’ सुनावणी सुरू असतानाच शिंदेसेनेला मोठं बळ; बड्या नेत्याचा पक्षप्रवेश

तुकाराम मुंढेंचा Dominos ला मोठा दणका! 3 आउटलेटचे परवाने निलंबित; मोठी खळबळ

Hot Chocolate Recipe: घरच्या घरी बनवा कॅफेसारखं क्रीमी आणि टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यात आणखी एक ठिकाणी कारने घेतला पेट

Gen z ना गटर जनरेशन म्हणणं कंगना रणौतना भोवणार? भाजप खासदार सापडल्या कायद्याच्या कचाट्यात, VIDEO

SCROLL FOR NEXT