Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : धनगर समाजाच्या आरक्षणावरून आदिवासी संघटना आक्रमक; दोंडाईचात रास्ता रोको

Dhule News : आदिवासीच्या आरक्षणामधूनच धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही देखील मागणी असल्यामुळे या मागणीच्या विरोधामध्ये आदिवासी संघटना आक्रमक झाल्याच्या बघावयास मिळाले आहे

भूषण अहिरे

धुळे : धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. दरम्यान धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देण्याचा सरकार विचाराधीन आहे. मात्र याला आदिवासी बांधवांचा विरोध असून याच मुद्द्यावरून आदिवासी संघटनांनी आज दोंडाईचा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी (Dhule) धनगर समाजाच्यावतीने वेळोवेळी मागणी करण्यात येत आहे. या दरम्यान आदिवासीच्या आरक्षणामधूनच धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही देखील मागणी असल्यामुळे या मागणीच्या विरोधामध्ये आदिवासी संघटना आक्रमक झाल्याच्या बघावयास मिळाले आहे. या दरम्यान एकलव्य भिल्ल जनसेवा मंडळ नंदुरबार चौफुली या ठिकाणी (Dondaicha) दोंडाईचा येथे आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको केला आहे. 

एक तास रास्ता रोकोने वाहुतक कोंडी 
जवळपास एक तास हा रास्ता रोको सुरू असताना या सर्व संतप्त आंदोलकांनी या ठिकाणी हा महामार्ग रोखून धरला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा देखील सामना वाहन धारकांना करावा लागला. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे देखील बघायला मिळाले आहे. या संदर्भात संबंधित तहसील अधिकाऱ्यांकडे आणि पोलीस प्रशासनाकडे या मागणीचे निवेदन आदिवासी संघटनांच्या वतीने देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT