Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: अपहरण केलेल्‍या तरुणाची सुटका; पोलिसांनी घेतले ताब्‍यात

अपहरण केलेल्‍या तरुणाची सुटका; पोलिसांनी घेतले ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

धुळे : अपहरण करून पळविलेल्या तरुणाची सुटका केली आहे. यानंतर धुळे तालुका पोलिसांनी (Police) तिघा अपहरणकर्त्यांचा शोध घेत ताब्‍यात घेतले आहे. (Live Marathi News)

राजस्थान येथील 21 वर्षीय तरुणाला मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथील तिघा जणांनी काही कारणास्तव अपहरण करून नेले होते. या संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदविण्यात आलेली होती. तक्रारीच्या अनुषंगाने (Dhule News) धुळे तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करत तिघा अपहरण कर्त्यांच्या धुळे तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

दोन दिवसांची पोलिस कोठडी

मध्य प्रदेश येथील मुरेना ग्वाल्हेर या ठिकाणी या तिघाही अपहरणकर्त्यांनी या तरुणाला जबरीने वाहनात कोंबून नेले होते. तालुका पोलिसांनी अचूक लोकेशन ट्रेस करत या तिघाही अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तिघाही आरोपींना न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली असून पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT