Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: डिझेल अंगावर ओतून आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

डिझेल अंगावर ओतून आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

भूषण अहिरे

धुळे : महाराष्ट्र ठेलारी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने डिझेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलीस (Police) कर्मचाऱ्यांनी तात्काळ संबंधित आंदोलकाच्या हातातून डिझेलने भरलेली बाटली हिसकावल्याने अनर्थ टाळला. (Tajya Batmya)

धुळे जिल्हा परिषद (Dhule ZP) कार्यालय समोरच महाराष्ट्र ठेलारी संघटनेच्या वतीने आत्मदहन आंदोलन करण्यात येत आहे. पशुसंवर्धन अधिकाऱ्याने गेल्या काही दिवसांपूर्वी मेंढ्यांवर सुरू असलेल्या आजारांवरील लसीं संदर्भात विचारणा करण्यासाठी गेलेल्या (Dhule News) महाराष्ट्र ठेलारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना, त्याचबरोबर ठेलारी बांधवांना अपमान कारक शब्द उच्चारत अपमान कारक वागणूक दिल्याचा आरोप लावला आहे. महाराष्ट्र ठेलारी संघटनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाला संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली होती.

आत्‍मदहनाचा दिला होता इशारा

यासंदर्भात जिल्हा प्रशासनातर्फे या मागणीची दखल घेण्यात न आल्यास महाराष्ट्र ठेलारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालय समोरच आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला होता. अखेर आज महाराष्ट्र ठेलारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोरच येऊन डिझेल अंगावर टाकत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी तात्काळ आक्रमक झालेल्या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP: महिलांना दरमहा ₹२५०० अन् गरीब कुटुंबाला २ सिलिंडर फ्री देणार, भाजपकडून मोठी घोषणा

खरातकडे 4 सिमकार्ड, महिलांसाठी खास नंबर, 3 कार्डवरून 3 वेगळे कांड, तपासात धक्कादायक माहिती आली समोर

घराला आग लागून घडली भीषण दुर्घटना; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

Gold Rate : सोन्याच्या दारात मोठी घसरण, चांदी ५ हजारांनी वाढली ;वाचा सुवर्णनगरीतले आजचे दर

Maharashtra Live News Update: मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला

SCROLL FOR NEXT