Dhule NCP Saam tv
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांच्‍या प्रतिमेला जोडे मारून निषेध; सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्‍त विधानाचे पडसाद

चंद्रकांत पाटलांच्‍या प्रतिमेला जोडे मारून निषेध; सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्‍त विधानाचे पडसाद

भूषण अहिरे

धुळे : भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद धुळ्यात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे धुळे (Dhule) महापालिकेच्या प्रवेशद्वारावर चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध केला आहे. (dhule news Protest by wearing shoes on the image of Chandrakant Patil)

भाजपचे (BJP) प्रदेश अध्‍यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्‍याबद्दल वादग्रस्‍त विधान केले. या विरोधामध्ये धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध केला आहे.

भाजप नेत्‍यांना अपमान करण्याची सवयच का?

जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप विरुद्ध बोलत असताना भाजपच्या नेत्यांना महिलांचा अपमान करण्याची सवयच झाली आहे का? असा संतप्त प्रश्न देखील यावेळी उपस्थित केला आहे. यावेळी जमलेल्या निषेधकर्त्या महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या विरुद्ध तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT