Dhule Congress Saam tv
महाराष्ट्र

Congress: महागाई धोरणा विरोधात धुळ्यात काँग्रेसकडून निषेध

महागाई धोरणा विरोधात धुळ्यात काँग्रेसकडून निषेध

भूषण अहिरे

धुळे : केंद्र सरकारच्या महागाई धोरणा विरोधात धुळ्यात काँग्रेस आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्या अध्यक्षतेखाली धुळ्यात (Dhule) काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. (Dhule News Congress Protest inflation policy)

कॉंग्रेसच्‍या (Congress) आंदोलनादरम्यान आंदोलकांनी भाजपच्या केंद्र सरकारवर सर्वसामान्य लोकांना महागाईच्या दरीत ढकलल्याचा आरोप लावला आहे. त्याचबरोबर (GST) जीएसटीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधताना खाण्यापिण्याच्या सामानावर देखील केंद्र सरकारने जीएसटी लावला असून त्याचबरोबर दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या बेडवर देखील केंद्र सरकारने जीएसटी लावण्याच पाप केले असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावला आहे.

तीव्र घोषणाबाजी करत निषेध

यावेळी आंदोलना दरम्यान जमलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून आपला निषेध व्यक्त केला आहे. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलन दरम्यान एकवटल्याचे बघावयास मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT