Dhule saam tv
महाराष्ट्र

Dhule: नवाब मलिक यांच्या अटकेचा धुळ्यात निषेध

नवाब मलिक यांच्या अटकेचा धुळ्यात निषेध

भूषण अहिरे

धुळे : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा धुळे शहरासह जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अल्पसंख्यांक समाज संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. (dhule news Protest against the arrest of Nawab Malik)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अल्पसंख्यांक शाखेचे प्रदेशाध्यक्ष महम्मद खान यांच्या निर्देशानुसार येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत येथे निषेध आंदोलनातून मंत्री मलिक (Nawab Malik) यांच्यावरील कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला. भाजपप्रणीत केंद्र सरकार हे राज्यातील महाविकास आघाडी (MahaVikas Aaghadi) सरकारमधील मंत्र्यांवर सूड उगवण्यासाठी ईडीचा वापर करीत आहे.

खोटे गुन्‍हे दाखल करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. दबावतंत्राचा वापर करीत (Dhule News) राज्यातील सत्ता घालविण्याचे केंद्राचे कटकारस्थान असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यासंदर्भात निषेध करत या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलीस प्रशासनातर्फे कार्यकर्त्यांतर्फे आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ताब्यात घेऊन सोडण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

Maharashtra Live News Update: भारत मुक्ती मोर्चाची इंदोरा चौकातून सुरुवात

DVT symptoms: जास्त वेळ बसणं आणि धूम्रपानामुळे रक्ताच्या गाठींचा धोका वाढतोय; तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

SCROLL FOR NEXT