Dhule ACB Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : बारा हजारांची लाच घेताना मुख्याध्यापकासह अधिक्षक ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

चिमठाणे (धुळे) : म्हळसर (ता.शिंदखेडा) येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळा कॅम्प सुलवाडे (ता. शिंदखेडा) येथे शालेय पोषण आहारा करिता (Dhule) भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट महिला बचत गटास देण्यात आले होते. भाजीपाला पुरवठ्याचे देयक मंजूर करून देण्याचा मोबदला म्हणून २० हजाराची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती ठरलेली १२ हजाराची लाच (Bribe) स्वीकारताना मुख्याद्यापक व अधीक्षकास एसीबीने ताब्यात घेतले. (Tajya Batmya)

अक्कलकोस (ता.शिंदखेडा) येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या (Ashram School) मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांना चार हजार रुपायांची लाच घेताना धुळे विभागाच्या लाचलुचपत विभागाने (Dhule ACB) अटक केल्याची घटना नुकताच घडली होती. यानंतर पुन्हा म्हळसर येथील शासकीय प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रदीपकुमार वामनराव राठोड (वय ३४, रा. विद्या कॉलनी, स्वामिनारायण मंदिरा मागे दोंडाईचा ता. शिंदखेडा) व कार्यालय अधीक्षक हनुक फुलसिंग भादले (वय ४७, रा. साईबाबा अपार्टमेंट मांडळ शिवार, शिरपूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात अधीक्षक हनुक भादले यांनी पंचांसमक्ष लाच स्वीकारली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजीपाला पुरवठा करण्यासाठीचे मागील नऊ महिन्याचे देयक मंजूर करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित दोन महिन्याचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षक यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती १२ हजार रुपयांची रक्कम देण्याचे ठरले होते. सदरची लाच स्वीकारताना कार्यालय अधिक्षकास २९ जानेवारीला दुपारी धुळे येथील लाचलुचपत विभागाच्या उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने पकडले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT