Dhule saam tv
महाराष्ट्र

Dhule: दारूची साठवणूक, चोरटी विक्री करणाऱ्या टोळीच्‍या आवळल्या मुसक्या

दारूची साठवणूक, चोरटी विक्री करणाऱ्या टोळीच्‍या आवळल्या मुसक्या

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलिसांनी अवैधरित्या दारूची साठवणूक करून इतर राज्यांमध्ये त्याची चोरटी विक्री करणाऱ्या टोळीतील दोघांसह दारूचा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करीत मुसक्या आवळल्या आहेत. (dhule news police action Storage of liquor sniffing of smugglers)

पिंपळनेर पोलिस (Police) ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धामनदर या परिसरात मोठ्या प्रमाणात दारूची साठवणूक होती. शिवाय त्याची इतर राज्यांमध्ये अवैधरित्या वाहतूक करून चोरटी विक्री केली जात असल्याची माहिती गुप्त माहिती दारा मार्फत पिंपळनेर पोलीस (Pimpalner Police) ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली होती.

अठरा लाखाचा मुद्देमाल जप्‍त

माहितीच्या आधारे पिंपळनेर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे मोठ्या प्रमाणात दारूचा साठा पोलिसांना आढळून आला. यासंदर्भात पोलिसांनी एका स्कार्पिओ कारसह दोघांच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत. या कारवाई दरम्यान पोलिसांनी जवळपास अठरा लाखाहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT