Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : विषारी साप खुुराड्यात घुसला, कोंबडीची ७ अंडी गिळली; सर्पमित्रानं मोठ्या हिंमतीनं वाचवलं

विषारी साप खुुराड्यात घुसला, कोंबडीची ७ अंडी गिळली; सर्पमित्रानं मोठ्या हिंमतीनं वाचवलं

भूषण अहिरे

धुळे : कोंबड्यांच्या खुराड्यात अत्यंत विषारी असलेल्या मनियार जातीचा साप (Snake) घुसला होता. खुराड्यात असलेल्‍या कोंबडीची सात अंडी गिळलेल्या या भल्या मोठ्या (Dhule) सापाला सर्पमित्राने रेस्क्यू करत जीवनदान दिले आहे. (Latest Marathi News)

धुळे तालुक्यातील कापडणे या गावातील कमलेश पाटील या शेतकऱ्याच्या शेतात कोंबड्याचा खुराडा आहे. या खुराड्यामध्ये अत्यंत विषारी समजला जाणारा मणियार हा साप आढळला असून, या नागाने या खुराड्यातील कोंबडीची सात अंडी फस्त केली होती. असे असताना सर्पमित्राने या नागाला रेस्क्यू करताच या नागाने आपल्या पोटात असलेली सात अंडे बाहेर टाकले.

सापाला सोडले अधिवासात

कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये असलेला विषारी नाग कमलेश पाटील यांना अचानक आढळून आला. त्यांनी तात्काळ गावातील सर्पमित्रास या संदर्भात माहिती दिली. सर्पमित्राने तात्काळ संबंधित ठिकाणी पोहोचून या अत्यंत विषारी नागाला सीताफिने रेस्क्यू करत पकडले. सर्पमित्राने या भल्या मोठ्या नागाला रेस्क्यू केल्यानंतर परिसरातील नागरिकांसह संबंधित शेतकऱ्याने सुटकेचा निश्‍वास सोडला. यानंतर सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडत त्याला जीवनदान देखील दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT