Shivaji Maharaj saam tv
महाराष्ट्र

बॉलपेनने साकारले शिवरायांच्‍या राज्‍याभिषेक सोहळ्याचे चित्र

बॉलपेनने साकारले शिवरायांच्‍या राज्‍याभिषेक सोहळ्याचे चित्र

साम टिव्ही ब्युरो

धुळे : धुळ्यातील शिवभक्त चित्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक सोहळ्याचे भव्यदिव्य चित्र काढले आहे. या चित्रांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या वाटेवर होण्याच्‍या मार्गावर आहे. (dhule news Picture of Shivaji maharaj coronation ceremony with a ball pen)

धुळ्यातील (Dhule) शिवभक्त चित्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) राज्याभिषेक सोहळाचे भव्य दिव्य जिवंत चित्र फक्त आणि फक्त बॉलपेनच्या सहाय्याने काढण्याचा मानस केला आहे. जवळपास नऊ फूट रुंद व पाच फूट लांबीचे हे भव्यदिव्य चित्र फक्त बॉल पेनच्या आधारे रेखाटून राजेंद्र सोनार (Rajendra Sonar) या शिवभक्त चित्रकाराने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी हे भव्य दिव्य कलरफुल चित्र बॉलपेनच्या आधारे काढले आहे. चित्र जवळपास 75 टक्के पूर्ण झाले असून राज्याभिषेक दिनापर्यंत हे चित्र पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे.

दीडशे बॉलपेन वापरले

वेगवेगळ्या पद्धतीने हे चित्र काढण्यासाठी राजेंद्र सोनार यांनी गेल्या आठ महिन्यांपूर्वी सुरुवात केली होती. आतापर्यंत जवळपास दीडशे पेक्षाही जास्त बॉलपेन हे चित्र रेखाटण्यासाठी वापरले गेले आहेत.

समुद्रातील स्‍मारकालात देणार भेट

हे त्र काढण्यासाठी राजेंद्र सोनार यांना त्यांच्या मित्र परिवाराकडून बरीच मदत करण्यात आली असल्याचे त्‍यांनी स्पष्ट केले. तर हे चित्र रेखाटून पूर्ण झाल्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी (Guinness Book of World Records) पाठविणार असल्याचे देखील राजेंद्र सोनार यांनी सांगितले. तसेच अरबी समुद्रामध्ये होत असलेल्या शिवस्मारकामध्ये हे चित्र भेट म्हणून देण्याची इच्छा देखील राजेंद्र सोनार यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT