Jitendra Awhad saam tv
महाराष्ट्र

Dhule BJP: भाजपकडून जितेंद्र आव्‍हाडांच्‍या प्रतिमेचे दहन

भाजपकडून जितेंद्र आव्‍हाडांच्‍या प्रतिमेचे दहन

भूषण अहिरे

धुळे : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्य शासनातर्फे आधीच प्रलंबित ठेवल्याचा ठपका ओबीसी संघटनांतर्फे लावण्यात आला आहे. यानंतर राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी आरक्षण संदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद धुळ्यात उमटत आहेत. भाजपतर्फे आव्‍हाड यांच्‍या प्रतिमेचे दहन करून निषेध करण्यात आला. (dhule news BJP burns image of Jitendra Awhad)

ओबीसी आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारतर्फे जारी करण्यात आलेला अध्यादेश न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी संघटना महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये आक्रमक झाल्या होत्‍या. अशातच अशा पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निषेध भाजपच्या आंदोलकांतर्फे करण्यात आला आहे.

आव्‍हाडांनी राजीनामा द्यावा

ओबीसी आरक्षण संदर्भात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केल्‍याने भाजपतर्फे निषेध करत मंत्री आव्हाड यांच्या प्रतिमेचे दहन करून मंत्री आव्हाड यांनी केलेल्या ओबीसी आरक्षण संदर्भातील वादग्रस्त विधानाचा समाचार भाजपतर्फे घेण्यात आला आहे. भाजपच्या आंदोलकांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली असून, मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करून आपला निषेध नोंदविला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Rule Change : आरबीआयनं नियम बदलले, ऑटो-पेमेंटची ती अट कायमची बंद, वाचा सविस्तर

FIR against minister: गृहमंत्र्यांवर FIR दाखल करा, कोर्टाचे आदेश; कबड्डी सामन्यात लावली होती ५०० रुपयांची पैज

Health Care: सतत थकवा, अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होतोय? मग शरीरात असू शकते ‘ही’ कमतरता; वेळीच व्हा सावधान

Badlapur News: नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा; राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरीतुमरी

Maharashtra News Live Update: नारा नदी पुलाखाली आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

SCROLL FOR NEXT