Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

पाण्याचा पुरवठा नाही; संतप्त नागरिकांचा पालिकेवर हंडा मोर्चा

पाण्याचा पुरवठा नाही; संतप्त नागरिकांचा पालिकेवर हंडा मोर्चा

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील बहुतांश भागांमध्ये अद्यापही दहा ते पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झालेला नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी तसेच समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी आज (Dhule) थेट पालिकेवरच हांडा मोर्चा नेला. (dhule news No water supply city Morcha of angry citizens against the municipality)

धुळे शहरातील बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठासाठी दहा ते पंधरा दिवस उशीर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार (Dhule Corporation) पालिका प्रशासनाला यासंदर्भात निवेदन देऊन देखील पालिका प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची ठोस उपाय योजना केली जात नाही. यामुळे समाजवादी पार्टीच्यावतीने तसेच संतप्त धुळेकरांनी पालिका आयुक्तांच्या कार्यालयातच हंडा मोर्चा नेला.

पाणीपुरवठा होईपर्यंत ठिय्या आंदोलन

त्याचबरोबर यापूर्वी देखील पालिका प्रशासनातर्फे खोटी आश्वासने देण्यात आल्यामुळे आता जोपर्यंत पाणीपुरवठा केला जात नाही. तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय देखील या आंदोलकांनी घेतला असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व आंदोलकांनी पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर हंडा मोर्चा नेत ठिय्या आंदोलन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT