Narayan rane 
महाराष्ट्र

या नाऱ्याचे करायचे काय..म्‍हणत धुळ्यात राणेंची प्रतीकात्मक प्रेतयात्रा

या नाऱ्याचे करायचे काय..म्‍हणत धुळ्यात राणेंची प्रतीकात्मक प्रेतयात्रा

भूषण अहिरे

धुळे : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात शिवसैनिकांकडून राज्यभरात आंदोलन केले जात आहेत. शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला. धुळ्यातही शिवसैनिक आक्रमक झाले असून राणेंची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. (dhule-news-narayan-rane-statement-shiv-sena-agresive-and-rane-Symbolic-funeral)

केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवार केलेल्या व्यक्तव्यचा निषेध म्हणून राज्‍यभरात पडसाद उमटत आहेत. वक्‍तव्‍याचा निषेध करत नारायण राणे यांना अटक करावी; अशी मागणी सर्वत्र होत आहे. तक्रारीनंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी राणे यांना अटक करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. समाजामध्ये तेढ, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ शकतो. यानुसार नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्याची शक्‍यता आहे.

प्रतीकात्मक प्रेतयात्रा

नारायण राणे यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करीत शिवसेनेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. संतप्‍त शिवसैनिकांनी नारायण राणे यांची प्रतिकात्‍मक प्रेतयात्रा काढली. तिरडी तयार करून त्‍यावर राणे यांची प्रेतयात्रा काढली.

या नाऱ्याचे करायचे काय..

शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. या नाऱ्याचे करायचे काय..या कोंबळी चोराचे करायचे काय; खाली डोके वरती पाय अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी नारायण राणेंच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT