Nagpanchami 
महाराष्ट्र

नागपंचमी : विषारी, बिनविषारी साप ओळखायचा कसा.. नागरिकांमध्ये जनजागृती

नागपंचमी : विषारी, बिनविषारी साप ओळखायचा कसा.. नागरिकांमध्ये जनजागृती

भूषण अहिरे

धुळे : पावसाळ्याच्‍या दिवसात सापांचा वावर वाढतो. यात साप दिसताच त्‍याला मारण्याचा प्रयत्‍न केला जातो. मग तो साप विषारी असो की बिनविषारी. त्‍याच्‍या भितीपोटी सापाला मारले जाते. परंतु, विषारी व बिनविषारी साप कसा ओळखायचा; याबाबत नागपंचमीनिमित्‍ताने सर्पमित्रांकडून जनजागृती केली जात आहे. (dhule-news-Nagpanchami-How-to-identify-poisonous-non-venomous-snakes)

सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सर्वत्र सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर सुरू असल्याचे बाघावयास मिळत आहे. परंतु या सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये साप हा बहुतांशी विषारी प्राणी शेतात इतरत्र आढळून येत असतो. परंतु त्याची पूर्णतः माहिती नसल्यामुळे नागरिकांमध्ये त्यासंदर्भात गैरसमज निर्माण होऊन बिनविषारी सापाचा किंवा विषारी सर्पाची कुठलीही शहानिशा न करता जीव घेण्यात येत असतो.

फलकावर माहिती दाखवून जनजागृती

नागरिकांमध्ये सापांविषयी जनजागृती निर्माण व्हावी; यासाठी नागपंचमी निमित्ताने निमगुळ येथील अंनिसचे पदाधिकारी दिलीप खिवांसरा यांनी सर्व जातीच्या सापांचे माहिती फलक गावात महिला व नागरिकांना दाखवून त्यांना या संदर्भाची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सापांविषयी माहिती होणे सर्वांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती परिसरामध्ये वावरणाऱ्या महिला व पुरुषांना प्रामुख्याने सापांविषयी माहिती देण्याचे काम सध्या ग्रामीण भागांमध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्क्कादायक! बहिणीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, अपहरण केलं अन्...

Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: धरण भरलं, पण जळगाव तहानलेलंच! हतनूरचं लाखो लिटर पाणी समुद्रात

DA Hike: सरकारी कर्मचारी अन् पेन्शनधारकांची लॉटरी! महागाई भत्त्यात मोठी वाढ; पाहा किती वाढणार पगार?

Moving car safety: धावत्या गाडीत सीट बदलणं का धोकादायक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT