Dhule News Saam tv
महाराष्ट्र

केमिकलच्या टँकरला आग; टायर फुटल्‍याने आग लागल्याची शक्‍यता

केमिकलच्या टँकरला आग; टायर फुटल्‍याने आग लागल्याची शक्‍यता

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई- आग्रा महामार्गावर केमिकलने भरलेल्‍या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. टायर फुटल्याने टँकरला ही आग लागल्याची (Dhule) प्राथमिक माहिती समोर आली आहे. (dhule news mumbai agra highway Fire at chemical tanker)

मुंबई– आग्रा महामार्गावर केमिकलने भरून जात असलेल्‍या धावत्‍या ट्रकच्‍या मागील बाजूने धुर निघत असल्‍याचे लक्षात आले. यानंतर ट्रक चालकाने रस्‍त्‍याच्‍या बाजूला ट्रक उभा केला. याबाबत अग्निशमन विभागाला (Fire Brigade) या संदर्भात घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांतर्फे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेमध्ये सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा तरुणाच्या आंदोलनाचा भडका! शाहांच्या राजीनाम्याची मागणी

Bath Routine: जापानी लोक सकाळी नाही तर रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करतात, जाणून घ्या यामागच्या ५ खास गोष्टी

Maharashtra News Live Update: शहादा समाज कल्याण वस्तीगृहात 40 विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Health Care: तुम्ही खाताय ते पनीर खरे की बनावट? 'या' सोप्या पद्धतीने करा जाणून घ्या

Skin Care: चेहऱ्याला थंडावा आणि नॅचरल ग्लो पाहिजे? मग हा घरी तयार केलेला फेसपॅक नक्की वापरा

SCROLL FOR NEXT