Accident Saam tv
महाराष्ट्र

तीन वाहनांचा विचित्र अपघात; अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

तीन वाहनांचा विचित्र अपघात; अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरापासून काही किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या पुरमेपाडा याठिकाणी मुंबई-आग्रा महामार्गावर तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात (Accident) झाला आहे. यात तीन जणांचा जागीच मृत्यु झाला. (Dhule news mumbai agra highway accident three death)

मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक, ॲपेरिक्षा आणि क्रुझर या तीन वाहनांमध्ये रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान अपघात झाला. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांपैकी ॲपेरिक्षा चालक बराच वेळ ट्रकखाली तसाच अडकून होता. रात्री उशिरापर्यंत अडकलेल्या ॲपेरिक्षा चालकाला क्रेनच्या सहाय्याने काढण्याचा पोलीस प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात आले. तर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

काहींची प्रकृती चिंताजनक

जखमीमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल होत पोलीस प्रशासनातर्फे बचावकार्य रात्री उशिरापर्यंत करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT