Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यातून मोटरसायकल चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात; तीन मोटारसायकली केल्या हस्तगत

Dhule News : धुळे शहरातील जेलरोड परिसरामध्ये तक्रारदाराने मोटरसायकल लावलेली असताना चोरट्याने तेथून मोटरसायकल लंपास केली होती

भूषण अहिरे


धुळे : धुळे शहरातून मोटारसायकल चोरी झाल्याची घटना घडली होती. मोटरसायकल चोरी करणाऱ्या मालेगाव येथील चोरट्याला धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने चोरी केलेल्या मोटरसायकलसह आणखी दोन मोटरसायकली पोलिसांनी या चोरट्याकडून हस्तगत केल्या आहेत. 

धुळे (Dhule) शहरातील जेलरोड परिसरामध्ये तक्रारदाराने मोटरसायकल लावलेली असताना चोरट्याने तेथून मोटरसायकल लंपास केली होती. या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात (Dhule Police) संबंधित तक्रारदाराने तक्रार दिली होती. यावरून धुळे शहर पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला. यादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे धुळे शहर पोलिसांनी सुरत बायपास हायवेवरील हॉटेलजवळ संबंधित चोरटा चोरी केलेल्या मोटरसायकलसह उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी पोहोचून मोटरसायकल चोरट्याला चोरलेल्या (Bike Theft) मोटरसायकलसह ताब्यात घेतले. याची पोलिसांनी आणखी चौकशी केली असता त्याने आणखी दोन मोटरसायकल चोरी केल्या असल्याची कबुली दिली. त्या मोटरसायकली देखील पोलिसांनी हस्तगत केल्या असून धुळे शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: १४ वर्षीय मुलीचं बलात्कार, वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य

Aadhaar Address Update : आता घरबसल्या बदला आधारवरील पत्ता; नवीन Aadhaar App मुळे प्रक्रिया झाली सोपी

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT