Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : महावितरणच्या कंत्राटी यंत्र चालकाचा विजेचा झटका लागल्याने मृत्यू

Dhule News : सोबतच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारार्थ धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

धुळे  : म्हसदी (ता. धुळे) येथील वीज उपकेंद्रातील कंत्राटी यंत्रचालकाचे विजेच्या धक्क्याने निधन झाले. २६ जानेवारीला (Dhule) उशिरा उपकेंद्रात काम करत असताना विजेचा धक्का बसल्याने मृत्यू (Death) झाला. (Maharashtra News)

देऊर खुर्द (ता. धुळे) येथील सनी ऊर्फ खेमचंद संजय देसले (वय २१) कंत्राटी वीज यंत्रचालक म्हणून (Mahavitaran) कार्यरत होते. दरम्यान २६ जानेवारीला रात्री उशिरा उपकेंद्रात काम करत असताना त्यांना विजेचा धक्का (Electric Shock) बसला. यानंतर सोबतच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारार्थ धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनमिळाऊ स्वभावाने परिसरात ओळख 
खेमचंद (सनी)ची गावासह परिसरात वेगळी ओळख होती. अतिशय मनमिळाऊ, हळव्या, प्रेमळ सनीच्या दुर्दैवी घटनेमुळे म्हसदीसह परिसरात हळहळ व्यक्त झाली. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. देऊर खुर्द येथील शेतकरी संजय दौलत देसले यांचे ते पुत्र होत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT