Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करत लाखोंची लूटमार; टोळी तिघे धुळे पोलिसांच्या ताब्यात

Dhule News : संबंधित ट्रक मालकाच्या तपासणी केलेल्या कागदपत्रात त्रुटी काढून त्यांना जवळपास १२ लाख ९६ हजार रुपयांची दंडाची मागणी केली. त्यानंतर जवळपास एक लाख तीस हजार रुपयांची रक्कम फोन पे द्वारे स्वीकारली.

भूषण अहिरे

धुळे : लाल दिव्याच्या गाडीचा वापर करीत आरोपिंनी संगणमताने जीएसटी अधिकारी असल्याची (Dhule) बतावणी करीत १ लाख ३० हजार रुपयांची लूटमार केली. दिवसाढवळ्या हा लुटमारीचा प्रकार झाला होता. आझादनगर पोलीस (Police) ठाण्यात नोंद असलेल्या या गुन्ह्याची उकल करीत पोलिसांनी टोळीला ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

महामार्गावर लाल दिव्याची गाडी उभी करत जीएसटी अधिकारी असल्याचे सांगत ट्रकची तपासणी करण्यात आली. यानंतर (Dhule Police) संबंधित ट्रक मालकाच्या तपासणी केलेल्या कागदपत्रात त्रुटी काढून त्यांना जवळपास १२ लाख ९६ हजार रुपयांची दंडाची मागणी केली. त्यानंतर जवळपास एक लाख तीस हजार रुपयांची रक्कम फोन पे द्वारे स्वीकारली. त्यानंतर त्यांची फसवणूक (Fraud) झाली असल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ आझादनगर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी या गुन्ह्याची उकल करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले. त्यानुसार तपास करत या गुन्ह्याची उकल संबंधित पथकातील तपास अधिकाऱ्यांनी केली असून, यातील तिघा जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून पुढील तपास धुळे पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT