Dhule Jalaj Sharma Saam tv
महाराष्ट्र

दलित सामाजिक बहिष्कार प्रकरणी होणार चौकशी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

दलित सामाजिक बहिष्कार प्रकरणी होणार चौकशी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

भूषण अहिरे

धुळे : धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथील दलितांवरील सामाजिक बहिष्कार प्रकरणावर जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच अहवाल सादर करण्याचे आदेश देखील दिले आहेत. (Dhule Today News)

धुळे (Dhule) तालुक्यातील मेहेरगाव या ठिकाणी दोन गटात जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दोन्ही गटाने एकमेकांच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल केला होता. यानंतर एका गटाने सामाजिक बहिष्कार टाकण्यासंदर्भातील तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. या प्रकरणास जिल्हाधिकाऱ्यांतर्फे गंभीरतेने घेत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी, विभागीय दंडाधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या प्रकरणाला जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्यातर्फे संबंधित अधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

‘साम’च्‍या बातमीनंतर दखल

या संदर्भातील बातमी साम टीव्हीने प्रसारित केली होती. यानंतर आता प्रशासनातर्फे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरनाचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे देखील आदेशित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT