Dhule NCP News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: कचरा ठेकेदारावर शाई फेक प्रकरण; राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कचरा ठेकेदारावर शाई फेक प्रकरण; राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी कचरा ठेकेदारावर राष्ट्रवादीच्या काही (Dhule News) पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे झालेल्या शाई फेक प्रकरणात राष्ट्रवादीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे (Anil Gote) यांनी परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे. (Maharashtra News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कचरा ठेकेदाराच्या कार्यालयामध्ये पोहोचून संबंधित ठेकेदारावर शाई फेकून एकच गोंधळ केला होता. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल झाला आहे.

माजी आमदार गोंटेंचे पत्रक

शाईफेक आंदोलनासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना कुठल्याही प्रकारची कल्पना दिली नसल्याचे म्हणत या प्रकरणाशी (NCP) राष्ट्रवादीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT