Dhule news Saam tv
महाराष्ट्र

Panjhara River : पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ; धुळे शहरातील पुलावरून नागरिकांना प्रवेश बंदी

Dhule news : अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे पांझरा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धुळे शहरातून गेलेल्या नदीवरील पुलावरील वाहतुकीला प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 

धुळे जिल्ह्याला आज देखील रेड अलर्ट देण्यात आलेला असून सकाळपासूनच पावसाचा जोर अधून मधून कायम आहे. (Akkalpada Dam) अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळेच अक्कलपाडा धरणातून ७७०० क्यूसेक वेगाने पांझरा नदीपात्रामध्ये (Panjhara River) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढत असल्यामुळे पांझरा नदी आता दुथडी भरून वाहू लागली आहे.

पांझरा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ होत असल्यामुळे धुळे शहरातील छोटा पूल पाण्याखाली जाण्याची भीती प्रशासनाला असल्यामुळे या पुलावरून प्रशासनातर्फे वाहतूक बंद करण्यात आली आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनातर्फे खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिगेटिंग करण्यात आली असून या पुलावरून प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या दरम्यान नागरिकांनी या पुलावरून प्रवास करू नये अशा सूचना देखील प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. तसेच अग्निशमन विभागाचे वाहन देखील आपत्कालीन परिस्थितीमध्ये सज्ज राहण्यासाठी उपस्थित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT