Dhule News Saam tv
महाराष्ट्र

अवैध सावकारी..फरार आरोपी संजय बंब ताब्‍यात

अवैध सावकारी..फरार आरोपी संजय बंब ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेला धुळ्यातील अवैध सावकार राजेंद्र बंब प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र बंब याच्यासह त्याचा भाऊ संजय बंब याला आरोपी करण्यात आले होते. अनेक दिवसांपासून फरार असलेल्‍या (Dhule News) संजय बंब यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्‍यात घेतले आहे. (dhule news Illegal moneylender Fugitive accused Sanjay bamb arrested)

अवैध सावकारी प्रकरणात संजय बंब याच्या विरोधामध्ये आझादनगर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर संजय बंब हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत फरार होता. त्याचा शोध धुळे (Dhule) पोलिसांतर्फे घेण्यात येत आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अथक प्रयत्न केल्यानंतर गुप्त माहिती दाराच्या मार्फत यासंदर्भात माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने संजय बंब यास मालेगाव येथून ताब्यात घेतले आहे.

रोकड, चेक, पावत्‍या हस्‍तगत

संजय बंब याच्या लॉकर्समधून पोलिसांनी छापा टाकत यापूर्वी मोठ्या प्रमाणात रोकडसह सह्या असलेले चेक त्याचबरोबर स्टॅम्प पेपर व फिक्स डिपॉझिटच्या मोठ्या प्रमाणात पावत्या हस्तगत केल्या होत्या. या अनुषंगाने आता पुढील कारवाई आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

SCROLL FOR NEXT