Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : धुळे जिल्ह्यात ९३ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Dhule News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात आली आहे.

भूषण अहिरे

धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध दारू विक्री व वाहतुकी संदर्भात विविध ठिकाणी कारवाईचे सत्र सुरु केले आहे. अशाच प्रकारे धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कारवाई करत तब्बल ९३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सीमावर्ती भागांमध्ये वाहनांची तपासणी करत असताना त्याचबरोबर अवैधपणे सुरू असलेल्या हातभट्ट्या व अवैधपणे सुरू (Dhule) असलेली मद्यविक्री अशा विविध प्रकारच्या कारवाया करीत जवळपास ७६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. अजून पुढे देखील हि कारवाई सुरूच राहणार आहे.  

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान जवळपास ५८ आरोपींना ताब्यात देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व एकंदरीत कारवाईदरम्यान ९३ लाख २ हजार ९७८ रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही महत्त्वाची आणि मोठी कारवाई मानली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

Dal Makhani recipe: रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी घरच्या घरी कशी बनवाल, लिहून घ्या रेसिपी

Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ

Historical Places : पर्वतरांगांच्या सान्निध्यात अन् नद्यांच्या संगमावर वसलाय 'हा' किल्ला, इतिहासातील अनोखा जलदुर्ग

उत्तर प्रदेशहून पहाटे ट्रेन मुंबईत पोहचली, ४ वाजता पोलिसांनी जनरल डब्ब्यात धाड टाकली, बॅग पाहून सगळेच चक्रावले

SCROLL FOR NEXT