धुळे : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावलेली नोटीस भाजपकडून जाळत त्याची होळी केली. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरोधात आंदोलन केले. (dhule news Holi of notices issued to devendra Fadnavis BJP agitation)
पोलीस खात्यातील बदल्याच्या महाघोटाळ्यावरुन पोलिसांनी विरोधी पक्षनेते देंवेद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांना नोटीस बजावली आहे. बजावलेल्या नोटीसनंतर धुळ्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा (BJP) कार्यालयाबाहेर नोटीसची होळी करून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला आहे.
आवाज दडपण्याचे काम
महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणलेले घोटाळे दाबण्यासाठी महा विकास आघाडी सरकारतर्फे देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. असे करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील यावेळी भाजपच्या आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारवर लावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.