Dhule rain
Dhule rain 
महाराष्ट्र

शिरूर परिसरात जोरदार पाऊस; घरांची झाली पडझड

भूषण अहिरे

धुळे : धुळे तालुक्यामधील शिरूड परिसरात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मातीच्या घरांची पडझड झाली आहे. यात सुदैवाने जीवित हानी झालेली नसून नुकसान मात्र झाले आहे. (dhule-news-Heavy-rain-in-Shirur-area-The-houses-collapsed)

धुळे तालुका परिसरात दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. मातीच्‍या घरांच्‍या भिंती पडल्‍या असून, यात कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नाही. घरांची पडझड झाल्यामुळे नागरिकांचे झालेल्या नुकसानी संदर्भात प्रशासनातर्फे पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.

बोरी नदीला पाणी

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बोरी नदीला देखील मोठ्या प्रमाणात पाणी आले असून बोरी नदी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दुथडी भरून वाहताना दिसत आहे. बोरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे परिसरातील शेतात असलेल्या विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी वाढून शेतकऱ्यांना या पाण्याचा पुढील काळामध्ये उपयोग होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : तुझे केस पाठीवरी मोकळे...

Shiv Sena UBT: खोटेपणा साप, बाळासाहेबांचा शाप..! Sanjay Raut नरेंद्र मोदींबाबत काय बोलून गेले?

Today's Marathi News Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दादर शिवाजी पार्कवर पोहोचणार

Pandharpur Vitthal Rukmini Temple News: पांडुरंगाच्या भक्तांसाठी दिलासा देणारी बातमी!

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींनीच केला खुलासा

SCROLL FOR NEXT