dhule heavy rain 
महाराष्ट्र

मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस; घरांवरील पत्रे उडाली

मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस; घरांवरील पत्रे उडाली

साम टिव्ही ब्युरो

भूषण अहिरे

धुळे : पावसाने मागील अनेक दिवसांपासून दडी मारली होती. पाऊस लांबल्‍यामुळे शेतकरी आस लावून होते. जूलै महिन्‍यातील दोन आठवड्यानंतर आज मध्‍यरात्रीनंतर पावसाने हजेरी लावली असून, वादळी पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. (dhule-news-Heavy-rain-after-midnight-Letters-flew-over-the-houses)

गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने धुळे तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. जून महिना पूर्ण उलटल्यानंतर देखील व जुलै महिन्याचा तब्बल दोन आठवडे उलटून देखील पावसाने दडी मारली होती. परंतु काल मध्यरात्री जोरदार पावसासह झालेल्या वादळी वाऱ्यासह आगमन झाले.

घरांवरील पत्रे उडाली

आरणी या गावातील काही घरांवरील पत्रे देखील उडून गेल्यामुळे घरांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर काही शेतात जनावरांसाठी असलेला चारा देखील पूर्णतः जमीनदोस्त झाला आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे उभे ठाकलेले संकट टळले असून पेरणी केलेल्या पितांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संजय राऊत यांच्या भेटीला

Vitamin E Capsule Benefits: व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे 5 आश्चर्यकारक फायदे, जे वाचून थक्क व्हाल

Gold Rate Today: दिवाळी पाडव्याला सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

Clothes Ironing Tips: इस्त्री करूनही कपड्यांवरच्या सुरकुत्या जात नाहीत? हे 5 सोपे उपाय करून बघाच

Jaggery Vs Sugar In Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी गूळ साखरेपेक्षा चांगला आहे का? रक्तातील साखर वाढू नये म्हणून गुळाचे सेवन किती करावे?

SCROLL FOR NEXT