आयएसएस 
महाराष्ट्र

वडीलांच्‍या निधनानंतर ठरविले अन्‌ करून दाखविले; ‘आयएसएस’ परीक्षेत हर्षदा देशात चौथी

वडीलांचे निधनानंतर ठरविले अन्‌ करून दाखविले; ‘आयएसएस’ परीक्षेत हर्षदा देशात चौथी

साम टिव्ही ब्युरो

नवलनगर (धुळे) : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या भारतीय सांख्यिकी (आयएसएस) परीक्षेत फागणे (ता. धुळे) येथील हर्षदा छाजेड हिने देशात चौथा, तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. केवळ छाजेड परिवारच नव्हे, तर फागणे गाव व धुळे जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. (dhule-news-Harshada-chajed-is-fourth-in-the-country-in-the-ISS-exam)

आत्मविश्‍वास, चिकाटी व आई, काका यांच्यासह परिवारातील सर्व सदस्यांचे मार्गदर्शन व गुरुजनांचे प्रोत्साहन यामुळेच हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया हर्षदाने बोलताना दिली. ती म्हणाली, की २०१५ मध्ये वडिलांचे निधन झाले. त्या वेळी जयहिंद महाविद्यालयात शास्त्र शाखेत संख्याशास्त्र विषयात अंतिम वर्षाला होती. त्या वेळीच उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे ध्येय ठेवले. पदवी परीक्षेतही प्रथम क्रमांक मिळविला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उच्चपदवीत सुवर्णपदकाची मानकरी ठरली.

पहिला प्रयत्‍न मुलाखतीत अपयश

पुण्यात जितो ॲडमिनिस्ट्रेटीव्ह ट्रेनिंग फाउंडेशन सेंटरमधील मार्गदर्शन मोलाचे ठरले. तसेच, नरेश पाटील यांनीही मार्गदर्शन केले. २०१९ मध्ये मुख्य परीक्षा पास होवून मुलाखतीत अपयश आले. मात्र, खचून न जाता ऑक्टोबर २०२० मध्ये मुख्य परीक्षेत पुन्हा यश मिळाल्यानंतर मुलाखतीतदेखील यशस्वी झाले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा प्रवास निश्‍चितच खडतर होता. अपयशाला संधी म्हणून बघितले, तर पुन्हा आत्मविश्‍वासाने उभे राहता येते. प्राथमिक ते उच्च पदवीपर्यंत गुरुजनांचे आशीर्वाद, कुटुंबाचे पाठबळ, मित्र-मैत्रिणींच्या शुभेच्छा यामुळेच यशस्वी झाले. चिकाटी व आत्मविश्‍वासाच्या जोरावर ध्येय साध्य करू शकतो.

- हर्षदा नंदलाल छाजेड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT