Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

आयुक्तांच्या कॅबिन बाहेरच ओतले गटारीचे पाणी; नागरीक संतप्‍त

आयुक्तांच्या कॅबिन बाहेरच ओतले गटारीचे पाणी; नागरीक संतप्‍त

भूषण अहिरे

धुळे : शहरातील प्रभाग क्रमांक 11 येथे मोठ्या प्रमाणात गटारी तुंबून गटारीचे घाण पाणी नागरिकांच्या घरांमध्ये तसेच मंदिरांमध्ये घुसत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, या संदर्भात वारंवार पालिका प्रशासनाला कळविले. तरी देखील कुठल्याही प्रकारची पालिका प्रशासनातर्फे दखल घेतली जात नसल्याने आज परिसरातील संतप्त नागरिकांनी गटाराचे पाणी थेट धुळे मनपा आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ओतून पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. (dhule Gutter water spilled just outside the commissioner cabin)

पालिका प्रशासनाला वेळोवेळी या संदर्भात निवेदन देण्यात आले आहेत. परंतु पालिका प्रशासनातर्फे फक्त वेळकाढूपणा करून खोटी आश्वासने यापूर्वी नागरिकांना देण्यात आली आहेत. गटारींचा प्रश्न जैसे थे असल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच आज पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तुंबलेल्या गटारीमधील घाण पाणी आणून थेट (Dhule) धुळे महापालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ओतले.

तर दालनाला कुलूप ठोकणार

पालिका प्रशासना विरोधात असलेला आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुढील एक महिन्यात पालिका प्रशासनातर्फे सकारात्मक भूमिका घेऊन गटारांचा प्रश्न सोडवण्यात न आल्यास पालिका आयुक्तांच्या कार्यालयास कुलूप ठोकून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त नागरिकांनी पालिका प्रशासनास दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT