Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: अत्याचारातून अल्पवयीन मुलगी प्रसूत; तरूणाविरूद्ध गुन्‍हा दाखल

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी प्रसूत; तरूणाविरूद्ध गुन्‍हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

धुळे : शहरातील चक्करबर्डी येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा रूग्णालयात अत्याचारातून मालेगाव (Malegaon) तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला. ही माहिती येथील शहर पोलिस (Police) ठाण्याला समजल्यानंतर मालेगाव तालुका पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यांनी टाळाटाळ केल्याने गुरुवारी (१८ मे) धुळे शहर पोलिसांनी (Dhule News) संशयित चिंग्या याच्याविरूध्द लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. तो मालेगाव तालुका पोलिसांकडे वर्ग केला आहे. (Tajya Batmya)

धानेगाव (ता. मालेगाव) येथील १७ वर्षीय मुलीचे पोट ८ मेस सायंकाळी दुखू लागले. त्यामुळे तिला नातेवाईकांनी येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान ती गरोदर आणि नऊ महिन्यांचे बाळ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. नऊ मेस पीडित मुलगी प्रसूत झाली. बाळ आयसीयूत असून मुलीची प्रकृती मध्यम आहे. याबाबत डॉक्टरांनी धुळे शहर पोलिस ठाण्याला या घटनेची माहिती दिली. नंतर येथील शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने मुलीच्या आईची चौकशी केली.

सकाळी कामावर जाताना मुलीला घरी एकटी सोडून जात असल्याचे आईने सांगितले. दोन ते तीन महिन्यांपूर्वी तिच्या पोटात दुखू लागल्याने आर्वी (ता. धुळे) येथे तपासणी केली असता डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले. याबाबत तिला विचारले असता तिने गावातील चिंग्या नामक तरुणाशी प्रेम व शरीरसंबंध असल्याचे सांगितले. भीतीपोटी मुलास काहीही विचारणा केली नसल्याचे पीडित मुलीच्या आईने चौकशीत सांगितले. याबाबत शहर पोलिसांनी मालेगाव तालुका पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मात्र, तेथील पोलिसांनी प्रतिसाद न दिल्याने धुळे शहर पोलिसांनी पीडितेच्या आईच्या जबाबावरून धानेगाव येथील चिंग्या नामक तरुणावर विविध कलमान्वये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT