Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: महिला हात दाखवून वाहन थांबवायची अन्‌.. जबरी लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

महिला हात दाखवून वाहन थांबवायची अन्‌.. जबरी लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

भूषण अहिरे

धुळे : महिलेचा आधार घेऊन मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहनांची लूट करणाऱ्या टोळीचा आझादनगर पोलिसांनी (Police) ताब्‍यात घेतले आहे. विशेष म्हणजे या टोळीमध्ये महिलेचा देखील सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. (Live Marathi News)

धुळे (Dhule) शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई– आग्रा महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहनांना लुटणाऱ्या (Robbery) टोळीने चांगलाच थैमान घातला होता. महिलेच्या मदतीने ही टोळी हायवेवरील वाहनांना लुटत होते. या टोळीला अखेर आझादनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

महिला हात दाखवायची अन्‌

मुंबई– आग्रा महामार्गावर ही महिला मदतीची मागणी करत वाहनांना हात देत वाहन थांबवायची. त्यानंतर आजूबाजूला दबा धरून बसलेल्या टोळीतील सर्वजण या थांबलेल्या वाहनावर तुटून पडायचे. वाहनातील मुद्देमाल चोरी करून पोबारा करायचे. चार ते पाच दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे या टोळीने मुंबई आग्रा महामार्गावर जबरी लूट केल्याची घटना उघडकीस आली होती. या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचत पहाटे लुटीच्या हेतूने हायवेवर असलेली टोळी पोलिसांना आढळून आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणेकरांची चिंता मिटली! धरणातील पाणी पातळीत वाढ; शहरात तूर्तास पाणीकपात नाही

घड्याळाच्या जाहिरातीत नेहमी 10:10 हीच वेळ का दिसते?

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Police Officer Transfer: मोठी बातमी! ६ पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडक्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Tourism : पावसाळ्यात सुंदर दिसणारे पण धोकादायक आहेत 'हे' ५ पिकनिक स्पॉट्स, जाण्याआधी १०० वेळा विचार करा

SCROLL FOR NEXT