Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime: बोगस नवरी, बनावट कुटुंब; लग्नाळू तरुणांना जाळ्यात ओढणारी अख्खी टोळीच अडकली!

Dhule news : धुळे शहरातील लग्नाळू मुलासाठी मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम एजंटच्या माध्यमातून गेल्या महिन्यात झाला होता.

भूषण अहिरे

धुळे : लग्न जमत नसल्याने अनेकजण एजंटच्या माध्यमातून नवरी मुलगी शोधत असतात. मात्र यातून फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशाच प्रकारे धुळ्यातील एका मुलाला बनावट नवरी व तिचे बनावट कुटुंब दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक करणारी हि टोळी पोलिसांच्या ताब्यात सापडली आहे. 

धुळे (Dhule) शहरातील लग्नाळू मुलासाठी मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम एजंटच्या माध्यमातून गेल्या महिन्यात झाला होता. त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांना एजंटकडून फोन आला की बघितलेल्या मुलीला आणखी इतर स्थळ आले असून आपणास लग्न करावयाचे असल्यास तीन लाख रुपये तात्काळ द्यावे. त्यानुसार मुलाच्या कुटुंबीयांनी तीन लाख रुपयांची जुळवाजुळव करून संबंधित एजंटला दिले. त्यानंतर २५ ऑगस्टला मध्य प्रदेश येथील बिजासन मातेच्या मंदिरात लग्न (Marriage) देखील लावण्यात आले.

भूक लागल्याचा बहाणा करत पलायन  

लग्न लागल्यानंतर वऱ्हाड धुळ्याकडे येत असताना सोनगीर येथे मुलीच्या आईने भूक लागल्याचा बहाणा करत हॉटेलवर थांबण्यास सांगितले. तेथे आधीच उभे असलेल्या दुचाकी धारकांसह मायलेकींनी पोबारा केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर (Dhule Police) चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. चाळीसगाव रोड पोलिसांनी अत्यंत शिताफीने या सर्व बनावट नवरी व तिच्या बनावट कुटुंबीयांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून सर्वाना मध्य प्रदेशातून अटक केली आहे. आता या टोळीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का> याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT