Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : गणपती उत्सवाला परिवार पुण्याला; घरातून तीन लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

गणपती उत्सवाला परिवार पुण्याला; घरातून तीन लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

भूषण अहिरे

धुळे : घरी कुणीही नसताना चोरट्यांनी संधी साधली आहे. चोरट्याने बंद घराचा कडीकोंडा व कुलूप तोडून (Dhule) जवळपास तीन लाखांहून अधिकचा सोन्या-चांदीचे दागिन्यांसह दहा हजार रुपये रोकड चोरून पोबारा केल्याची घटना (Shirpur) शिरपूर येथील सुभाष कॉलनी येथे उघडकीस आली आहे. (Live Marathi News)

शिरपूर येथील सुभाष कॉलनीत घरमालक हे पुण्याला गणपती उत्सवानिमित्त गेले होते. संपूर्ण परिवार पुण्याला (Pune) गेला असल्याने त्यांच्या घराला कुलूप लावलेले होते. हि संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून दागिने व रोख रक्कम लांबविली आहे. शेजारच्यांना अचानकपणे घराचे कुलूप बाजूला पडलेले व घराचा दरवाजा उघडा अवस्थेमध्ये आढळून आला. याबाबत शेजारच्यांनी तात्काळ संबंधितांना फोन करून त्यांच्या घरात चोरी झाली असल्याची माहिती दिली. त्यावरून शिरपूर पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली.  

घरफोडीमध्ये जवळपास तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले असून, त्यात दहा हजार रुपये रोकड देखील चोरट्यांनी लंपास केली आहे. चोरी संदर्भातील तक्रार शिरपूर पोलिसात दाखल झाल्यानंतर शिरपूर पोलिसांनी श्वानपथकासह इतर तपास यंत्रणांबरोबर तपास करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT