Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: ऐन पावसाळ्यात १२ गावांना पाणीटंचाई

ऐन पावसाळ्यात १२ गावांना पाणीटंचाई

साम टिव्ही ब्युरो

धुळे : पावसाळ्याचे तीन महिने लोटल्यानंतर एकीकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना दोंडाईचा (Dondaicha) परिसरातील जवळपास १२ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कर्ले (ता. शिंदखेडा) गावाला तर चक्क आजूबाजूच्या पाच विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे, त्यानंतरही गावाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे (Rain) पावसाळ्यानंतर काय स्थिती राहील याची ग्रामपंचायतीला चिंता आहे. (Dhule News Water Supply Issue)

कर्ले, परसुळे, मांडळ, विखरण, चुडाणे, खर्दे, अंजनविहीरे, चौगांव बु., चौगांव खु, सोनशेलू, सुराय, वरझडी (Dhule) आदी गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना अद्यापही पाणी आलेले नाही. या गावांमध्ये सलग दोन वर्षापासून अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने ही गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. दरम्यान, अशातच ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहीत विहीर बंद करण्यात यावे अशा आशयाचे पत्र तहसीलदारांनी दिल्याने चिंतेत भर पडली आहे. कर्ले गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या वर एक पाझर तलाव असून, त्यात गेल्या वर्षी एक थेंबही पाणी आले नाही. यावर्षीदेखील आता पावसाळ्याचे तीन महिने लोटल्यानंतरदेखील त्यात जलसाठा नाही. त्यामुळे विहिरींना पाणी येण्याचा प्रश्नच येत नाही. या ठिकाणी जून, जुलै, ऑगस्टमध्ये रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे ते पाणी केवळ जमिनीत मुरले. शासन दरबारी पावसाची जी नोंद होते त्यात सर्कलनिहाय पाऊस मोजला जातो. मात्र शेवाडे सर्कलमध्ये कर्ले, परसुळे या गावांना इतर गावांप्रमाणे पावसाचे प्रमाण नसताना देखील शासन दरबारी चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे विहीर अधिग्रहण बंद करण्याबाबत तहसीलदारांकडून आदेश आले असावेत. प्रत्यक्षात गावात वेगळे चित्र आहे.

बुराईतून तलाव भरा

पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या बुराई नदीच्या पाण्यातून सतारे, कर्ले, चुडाणे, सुराय, आदी गावांना लाभ होण्यासाठी सतमाने येथील बुराई नदीतून एक्सप्रेस कॅनाल किंवा नैसर्गिक उताराने एक-दीड कोटीचा निधी खर्च केल्यास पाणीप्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. त्यासाठी कर्ले ग्रामपंचायतीने ठरावही केला असून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT