Robbery 
महाराष्ट्र

दारूचे खोके चोरीचा डाव फसला; सीसीटीव्‍हीत चोरटे कैद

दारूचे खोके चोरीचा डाव फसला; सीसीटीव्‍हीत चोरटे कैद

भूषण अहिरे

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे गेल्या कित्येक दिवसांपासून चोरीच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. या चोरीच्या घटना रोखण्यासाठी दोंडाईचा पोलिसांतर्फे रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यात आली आहे. तरी देखील रात्री दारूच्‍या दुकानातून चोरट्यांनी प्रवेश करत चोरीचा प्रयत्‍न केला. मात्र हा प्रयत्‍न उधळला गेला. (dhule-news-dondaicha-city-wine-shop-robbery-try-fail-police-cctv-futage)

दोंडाईचा येथे स्टेशन भागातील रहदारीच्या ठिकाणी रस्त्यावरील नगरपालीकेच्या व्यापारी गाळ्यातील दारूच्या किरकोळ विक्री दुकानात सराईत आठ ते दहा अनोळखी चोरांनी प्रवेश केला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुकानाचे शटर अर्धवट तोडत दारूच्या बाटल्या भरलेले खोके पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

पोलिस व्‍हॅनचा आवाज आला अन्‌

हातगाडीवर बिनधास्त दारूचे खोके वाहून चोरी करत असतांना रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर पोलिस व्हॅनचा आवाज येताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु चोर पळून जान्यात यशस्वी झाले. चोरीची ही सर्व घटना व्यापारी गाळ्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून यामध्ये चोरट्यांच्या सर्व हालचाली दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT