Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: खाकीचा गैरवापर करणाऱ्याला बडतर्फ करा; सकल धनगर समाज आक्रमक

खाकीचा गैरवापर करणाऱ्याला बडतर्फ करा; सकल धनगर समाज आक्रमक

भूषण अहिरे

धुळे : खाकीचा गैरवापर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यास कायमस्वरूपी बडतर्फ करा; या मागणीसाठी सकल धनगर समाज आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाला आहे. धुळे (Dhule) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या क्यूमाईन क्लब समोर धरणे आंदोलन करण्यात आले. (Maharashtra News)

जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव येथील धनगर बांधवाच्या घरावर गावातील काही लोकांनी सामुहिक हल्ला करुन दगडफेक केल्याची घटना समोर आली होती. याबाबतची तक्रार देण्यासाठी गेलेल्या अन्यायग्रस्त लोकांची तक्रार दाखल करुन न घेता उलट त्यांनाच पोलिस (Police) कोठडीत मारहाण केली. तसेच खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करीत सदरील पीडित नागरिकांना दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

या प्रकारात आष्टी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शिवाजी नागवे हे फिर्यादी नागरिकांना मारहाण करीत शिवीगाळ करीत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. कायदा पायदळी तुडवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास बडतर्फ करण्यात येवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा; अशी मागणी या आंदोलकांतर्फे करण्यात आली आहे. यावेळी सकल धनगर समाज धुळे जिल्ह्याचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना मिळेल दिलासा

Friday Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी संधी, या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT