Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: रस्‍त्‍याच्‍या कामात निकृष्टता; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

रस्‍त्‍याच्‍या कामात निकृष्टता; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

भूषण अहिरे

धुळे : पंतप्रधान ग्रामसडक योजनेत अंतर्गत सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्‍याचा आरोप नागरीकांनी केला. आहे. हे तात्‍काळ थांबवावे तसेच संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची परिसरातील नागरिकांतर्फे (Dhule News) मागणी करण्यात आली आहे. (Dhule News PM Gram Sadak Yojana)

साक्री (Sakri) तालुक्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून चिंचपाडा- बोदगांव- भोनगांव- आमोडे- झंजाळे- सामोडे ह्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु या रस्त्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्टता दिसून येत असून जवळपास नऊ मीटरचा असलेला रस्ता फक्त आणि फक्त सहा मीटरमध्ये बसवण्यात आला आहे.

माती मिश्रण करून धोकेदायक काम

ठेकेदारातर्फे या ठिकाणी पूल बांधण्याचे काम सुरू असून या कामात अक्षरशः वाळू ऐवजी माती मिश्रन करून धोकेदायक काम करण्यात येत असल्याचे परिसरातील नागरिकांतर्फे स्पष्ट करण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांतर्फे हे निकृष्ट काम तात्काळ थांबवण्यात यावे; अशी मागणी करण्यात येत असून संबंधित ठेकेदारास तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT