BJP 
महाराष्ट्र

साक्री तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करा; भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन

साक्री तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करा; भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन

साम टिव्ही ब्युरो

साक्री (धुळे) : तालुक्यात यंदा पाऊस अत्यंत कमी झालेला असून अर्ध्याहून अधिक नक्षत्रे संपलेली असताना अद्यापपर्यंत नदीनाल्यांना पाणी आलेले नाही. या सर्व परिस्थितीचा विचार करता तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शासन नियमाप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांची मदत मिळावी या मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षातर्फे शुक्रवारी (ता. २७) तहसीलदारांना देण्यात आले. निवासी नायब तहसीलदार डॉ. अंगद असटकर यांनी निवेदन स्वीकारले. (Dhule-news-Declare-famine-in-Sakri-taluka-BJP-statement-to-tehsildar)

निवेदनात म्‍हटले आहे की, ऐन पावसाळ्यात तालुक्यातील कोणत्याही नदी, नाले यांना अद्याप पाणी व पुर आलेला नाही. शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीची पाणी पातळी देखील खालावली असून शेतकऱ्यांनी केलेली पेरणी पिके वाया जाण्याच्या परिस्थितीत आल्याने काही शेतकऱ्यांनावर दुबार पेरणी करण्याची संकट आले आहे.

पिके वाया जाण्याच्या स्थितीत

अनेक वर्षांपासून शासनाच्या कृषी विभागाने तालुक्यातील कोणत्याही मंडळात पर्जन्यमापक बसविलेले नसून तालुक्यात किती पाऊस झाला याची कोणतीही आकडेवारी यामुळे उपलब्ध होत नाही. तरी संबंधित यंत्रणेने लक्ष घालून सदरची सोय करावी. या पुढील काळात ही पाऊस येण्याची कुठलीही शक्यता वाटत नसल्याने शेतकऱ्यांची पिके वाया जाण्याच्या स्थितीत आहेत. ही परिस्थितीचे प्रत्यक्ष शिवारांचे अवलोकन करून यंत्रणे मार्फत पाहणी व स्थळ निरीक्षणे करून योग्य तो निर्णय घेऊन साक्री तालुका हा दुष्काळी जाहीर करावा. या पुढील काळात तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. पर्यायाने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहील म्हणून शासकीय स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून तालुक्यास टंचाईचा सामना करता यावा अशी उपाय योजना कराव्यात. साक्री तालुका दुष्काळी जाहीर व्हावा यासाठी योग्य ती पावले उचलून तालुक्याच्या जनतेस दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे. याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, साक्री मंडळाध्यक्ष वेडू सोनवणे, पिंपळनेर मंडळाध्यक्ष मोहन सूर्यवंशी, तालुका संघटक ॲड. सुरेश शेवाळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी देवरे, सरचिटणीस प्रदीप नांद्रे, प्रा. विजय देसले, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष बाबा पठाण, किरण सोनवणे, राकेश दहिते, दिनेश नवरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT