Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Death News: तारेवर कपडे सुकवताना झाला घात; शॉक लागून सासू-सूनेचा मृत़्यू

Death Due to Electric Shock: तारेवर कपडे सुकवताना झाला घात; विजेचा धक्काने सासू- सुनेचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

धुळे : शहरातील साक्री रोडवरील बजरंग सोसायटीत बुधवारी (१९ जुलै) रात्री दुर्दैवी घटना घडली. घरातील तारेवर ओले कपडे सुकवताना विजेचा शॉक (Electric Shock) लागला. यात सुनेसह सासूचा मृत्यू झाला. शोभाबाई (Dhule) कृष्णा झिने (वय ३९) व रुखमाबाई पांडुरंग झिने (वय ६५, रा.प्लॉट क्रमांक ५४, बजरंग सोसायटी, महिंदळे शिवार, साक्री रोड, धुळे) असे मृत सून व सासूचे नाव आहे. (Live Marathi News)

धुळे शहरातील शोभाबाई झिने या बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरातील ओले कपडे तारेवर सुकवत होत्या. मात्र तारेमध्ये विद्युत प्रवाह असल्याने शोभाबाई यांना विजेचा धक्का बसला. त्यावेळी सासू रुखमाबाई या तेथे बसल्या होत्या. शोभाबाई तारेसह रुखमाबाई यांच्या अंगावर पडल्या. त्यामुळे रुखमाबाई यांनाही विजेचा धक्का बसला. त्यात दोघींचा जागीच मृत्यू झाला. 

सदर घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत घरातील वीजप्रवाह बंद करून दोघींना बाजूला केले. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, राजश्री पाटील व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत धुळे तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF खात्याची संपूर्ण माहिती आता WhatsApp वर! ही प्रोसेस करा फॉलो अन् मिळवा PF Balance, Claim Status आणि KYC ची माहिती

Wednesday Horoscope : पैसा, धनलाभ आणि प्रगतीचा योग! ‘या’ ७ राशींवर लक्ष्मीची कृपा, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: राज्यातील अनेक तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती

Maharashtra Rain : २ दिवस राज्यात या भागात मुसळधार पावसाचा अंदाज, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान?

Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, CM देवेंद्र फडणवीस परवानगीबाबत स्पष्टच बोलले, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT