अनिल गोटे 
महाराष्ट्र

त्‍या सुनील पाटलाचा संबंध राष्‍ट्रवादी नव्‍हे तर भाजपशी; अनिल गोटे यांचा पलटवार

त्‍या सुनील पाटलाचा संबंध राष्‍ट्रवादी नव्‍हे तर भाजपशी; अनिल गोटे यांचा पलटवार

भूषण अहिरे

धुळे : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी अर्थात आर्यन खानप्रकरणी पैसे उकळण्याच्या घटनेशी नाव जोडले गेलेल्या धुळे शहरातील संजय चौधरी-पाटील यांचे नाव समोर आले. सुनील पाटील यांचे संबंध राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍याशी संबंध असल्‍याचे सांगितले जात आहे. परंतु, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अनिल गोटे यांनी या आरोपांचे खंडन करीत उलट सुनील पाटील या इसमाचा भाजपशी संबंध असल्याचा पलटवार केला. (dhule-news-cruise-drugs-case-Sunil-Patil-connection-is-not-with-NCP-but-with-BJP-Anil-Gote-statment)

आर्यन खान प्रकरणात रोजच नवनवीन खुलासे समोर येत आहे. या प्रकरणात धुळ्यातील सुनील पाटील या इसमाचे नाव समोर आले असून या इसमाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांशी संबंध असल्याची माहिती समोर आली असतांना यावर माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अनिल गोटे यांनी या आरोपांचे खंडन करीत उलट सुनील पाटील या इसमाचा भाजपशी संबंध असल्याचा पलटवार केला आहे.

पैशांसाठी वानखेडेंनी सेलिब्रेटींचे प्रकरण आणले उघडकीस

समीर वानखेडे यांना धुळ्यातील गांज्या शेती संदर्भात गोटे यांनी माहिती देऊन देखील समीर वानखेडे यांनी याकडे दुर्लक्ष केले. कारण याठिकाणी गरीब शेतकऱ्यांकडून वानखेडेंना काहीच मिळाले नसते. ते फक्त सेलिब्रेटींचे प्रकरण पैशांसाठी उघडकीस आणत असल्याचा देखील आरोप गोटे यांनी समीर वानखेडे यांच्यावर लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची आज नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक

Pune News: होर्मुझमध्ये इराणकडून जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, पुण्याच्या इंजिनिअरचा मृत्यू

Malvan Fort : मालवणमधील ऐतिहासिक रत्न! अरबी समुद्रावर नजर ठेवणारा 'हा' किल्ला आजही दिमाखात आहे उभा

अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

SCROLL FOR NEXT