Murder case 
महाराष्ट्र

BREAKING..महिलेचा खून करून टांगले झाडाला

सदर महिला आदिवासी समाजाची असून साधारण चाळीस वर्ष वयोगटातील महिला असल्‍याचा अंदाज आहे.

भूषण अहिरे

धुळे : शिरूड (ता. धुळे) परिसरात अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह झाडाला टांगल्‍याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास करत आहेत. (dhule-news-crime-news-killed-the-woman-and-hanged-her-tree)

शिरूड (ता.धुळे) परिसरात सकाळी नागरीकांना महिलेचा मृतदेह झाडाला टांगलेल्‍या अवस्‍थेत आढळून आला. सदर महिलेचा चेहऱ्यावर दगडाने मारल्‍यानंतर तिला साडीने गळफास दिलेला आहे. विचित्र अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर महिला आदिवासी समाजाची असून साधारण चाळीस वर्ष वयोगटातील महिला असल्‍याचा अंदाज आहे. याबाबत पोलिसांना कळविले असता घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. तसेच स्वान पथक व इतर तपास यंत्रणादेखील घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास अद्याप सुरू आहे.

(बातमीचे संपुर्ण अपडेट थोड्यावेळात).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT