Dhule Crime
Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

बियाण्यांवरून व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला, लोखंडी हूक....; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

भूषण अहिरे

धुळे : दोन व्यापाऱ्यांमध्ये ग्राहकावरून झालेल्या बाचाबाचीत एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाराच्या पोटात धारदार लोखंडी हुक पोटात खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार शिरपूर (Shirpur) येथे उघडकीस आला असून या सर्व घटनेचा थरार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (CCTV Camera) कैद झाला आहे. (dhule news crime news An iron hook stuck in the stomach beating the merchant)

आपल्या दुकानात बियाणांची विचारणा करून बाजूच्या दुकानावर ग्राहक (Dhule News) गेला. या रागातून व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याचा पोटात पोत्यातून धान्य काढण्याचा लोखंडी हुक खुपसुन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली. शहर पोलिसांनी याप्रकरणी एकास (Crime News) अटक केली असून दुसरा संशयित अद्याप फरार आहे.

जखमी झालेल्या व्यापाराच्या पोटात धारदार हुक घुसल्याने मोठ्या प्रमाणात जखमा पोटावर झाल्या आहेत. यामध्ये जखमी व्यापारी थोडक्यात बचावला असून सध्या खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Lok Sabha 2024: प्रचाराचा शेवटचा टप्पा; आज पुण्यात सभांचा धडाखा; अजित पवार, सुप्रिया सुळे अन् देवेंद्र फडणवीस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात

Madhya Pradesh Election: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' चार जिल्ह्यांत फेरमतदान होणार

Horoscope: लग्नाचा योग, व्यवसायात यश; तुमच्या राशीत काय?

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT