Dhule NCP News Saam tv
महाराष्ट्र

Dhule NCP News: अजित पवारांसह फुटीरवादी नेत्यांचे झाकले फोटो; धुळे राष्‍ट्रवादी कार्यालयातील प्रकार

अजित पवारांसह फुटीरवादी नेत्यांचे झाकले फोटो; धुळे राष्‍ट्रवादी कार्यालयातील प्रकार

भूषण अहिरे

धुळे : राज्‍यात सुरू असलेल्‍या घडामोडीनंतर धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यालयात अजित पवारांसह (Ajit Pawar) फुटीरवादी नेत्यांचे फोटो झाकले आहेत. अर्थात (Dhule) धुळे राष्‍ट्रवादी ही शरद पवार यांच्‍यासोबत असल्‍याचे चित्र यावरून स्‍पष्‍ट दिसून येत आहे. (Maharashtra News)

राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर राज्यात याचे पडसाद उमटत आहे. याच दरम्‍यान धुळ्यात देखील पडसाद ऊमटायला सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या धुळे राष्ट्रवादी भवन येथील फोटोंना पांढरे कागद चिपकवून या फोटोंना झाकण्यात आले आहेत.

पवारांच्‍या भुमिकेचा निषेध

राष्‍ट्रवादी भवनातील रूपाली चाकणकर, छगन भुजबळ व अजित पवार तसेच हसन मुश्रीफ यांचे फोटो झाकण्यात आले आहेत. तर (Dhule NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपण शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचा ठाम निश्चय केला असल्याचे व्यक्त करत अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? हे उपाय खुलवतील तुमचं हास्य

SCROLL FOR NEXT